लोणीकंदमधील महिलेवर नात्यातील तरुणाचा वारंवार बलात्कार , महिला म्हणतेय..

Spread the love

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून एका महिलेचा पती घरी नसताना नातेवाईक असलेल्या एका तरुणाने विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सदर प्रकरणी 29 वर्षीय विवाहित महिलेने लोणीकंद पोलिसात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली असून 27 वर्षीय तरुणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुमारे दीड वर्षापर्यंत हा प्रकार सुरू होता असे पीडितेचे म्हणणे आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही लोणीकंद परिसरात राहत असून तिचा पती चालक असल्याने तो दिवसभर घराच्या बाहेर असायचा याचाच फायदा घेत महिलेचा एक नातेवाईक सातत्याने तिच्या घरी येऊ लागला आणि तिच्या सोबत ओळख वाढवत गेला. त्यानंतर एके दिवशी त्याने जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन सातत्याने तिच्यासोबत असा प्रकार करू लागला.

सुरुवातीला पीडित महिलेने त्याचा त्रास काही दिवस सहन केला मात्र त्यानंतर तो महिलेला बदनाम करण्याची धमकी देऊ लागला तसेच तिला व्हिडिओ कॉल करून त्यांचे नग्नावस्थेतील फोटो शेअर करण्याची देखील धमकी तिला देत होता. त्याचा त्रास असह्य झाल्याने पीडित महिलेने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली असून लोणीकंद पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत .


Spread the love