
सोशल मीडियावर सध्या एका विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून पाकिस्तान येथील ही घटना आहे. एकदा लग्न केल्यानंतर मरेपर्यंत अनेकजण त्याच व्यक्तीसोबत संसार करतात मात्र पाकिस्तान येथील 110 वर्षांचे एक आजोबा यांनी चौथ्यांदा लग्न केलेले आहे. त्यांच्या या विवाहात त्यांच्या आधीच्या पत्नी आणि नातवंडे देखील सहभागी झालेली होती.
उपलब्ध माहितीनुसार , पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा येथील ही घटना असून हा विवाह करण्यासाठी या आजोबांनी 5000 रुपयांची मेहर दिलेली आहे. वयस्कर माणसाच्या लग्नाच्या कारणामुळे या कुटुंबाची सध्या पाकिस्तानसोबतच जगभरात चर्चा सुरू झालेली आहे. 110 वर्षांच्या वयाच्या या आजोबांच्या कुटुंबात सध्या 84 व्यक्ती असून त्यामध्ये त्यांच्या पत्नी , त्यांच्या पत्नी सुना आणि नातवंडांचा समावेश आहे.
अब्दुल हन्नान असे 110 वर्षीय वृद्ध व्यक्तीचे नाव असून त्यांनी आता आयुष्यात चौथ्यांदा विवाह केलेला आहे. त्यांनी ज्या महिलेशी विवाह केलेला आहे त्यांचे वय 55 वर्ष असून काजी मोहम्मद अर्शद यांच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा पार पडलेला आहे. परिसरातील माजी नगरसेवक देखील या विवाह सोहळ्याला उपस्थित झालेले होते. अब्दुल हन्नान यांना पहिल्या तीन पत्नीपासून एकूण बारा मुले आहेत त्यामध्ये सहा मुली आणि सहा मुलगी आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचे वय 70 वर्ष असून त्याला देखील आता नातवंडे आलेली आहेत.