विवाहितेच्या प्रेमात कुस्करी ? आता पोलिसात पोहचले प्रकरण

Spread the love

प्रेमप्रकरणात जोपर्यंत गोडी गुलाबी असते तोपर्यंत सर्व काही ठीक असतं मात्र एकदा ब्रेकअप झालं की त्यातून वेगवेगळे प्रकार सुरू होतात अशी एक घटना नाशिक इथे उघडकीला आली असून नाशिक रोड परिसरात प्रेमप्रकरणात प्रियकराकडून होणाऱ्या त्रासामुळे प्रियकराशी ब्रेकअप झाल्यानंतरही सतत त्या महिलेचा पाठलाग करत तिचा विनयभंग करण्याची घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, गोसावी नगर येथील राहणारा संशयित आकाश दिगंबर गोसावी याचे पीडित महिलेसोबत दोन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते मात्र ब्रेकअप झाल्यानंतर देखील त्याने तिला शिवीगाळ केली म्हणून पिडीत महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.


Spread the love