
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नागपूर इथे समोर आलेली असून सावनेर बस स्टॉपच्या मागील केशव लॉजमध्ये एक 27 वर्षीय युवकाचा त्याच्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवत असताना मृत्यू झालेला आहे. मयत तरुण हा कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा या गावातील निवासी असून खासगी चारचाकी गाडी चालविण्याचे काम करत होता तर त्याची 21 वर्षीय प्रेयसी मध्यप्रदेश येथील असल्याचे समजते .
उपलब्ध माहितीनुसार, अजय जंगलूजी परतेकी असे त्याचे नाव असून त्याने शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी उत्तेजक द्रव्याचे सेवन केलेले होते मात्र शारीरिक संबंध ठेवताना त्याला धाप लागली आणि तो बेशुद्ध पडला असे त्याच्या प्रेयसीचे म्हणणे आहे . एका खाजगी गाडीत ते लॉजवर आले आणि शारीरिक संबंध ठेवताना हा प्रकार घडला. त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले तोपर्यंत तो जिवंत होता मात्र त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
डॉक्टर मयूर डोंगरे यांनी त्याला मृत घोषित केले असून अजयच्या खिशातून उत्तेजित करणारी औषधं मिळून आली आहेत . शारीरिक संबंध ठेवण्याआधी त्याने या औषधाचे सेवन केले आणि त्यानंतर हा प्रकार घडला. पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी पांढुरणा मध्यप्रदेश येथे राहणाऱ्या त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले असून तिच्या कडून ‘ पल पल ‘ अपडेट घेण्याचे काम सुरु आहे .
अजय याचे त्याच्या प्रेयसीसोबत गेल्या 3 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली असून ते लग्नही करणार होते. अजय रविवारी दुपारी 3 वाजता प्रेयसीला सोबत घेऊन सावणेरच्या केशव लॉजमध्ये घेऊन गेला. प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवताना त्याने उत्तेजित करणाऱ्या गोळ्या घेतल्या होत्या आणि यानंतर नको त्या अवस्थेत तो खाली पडून बेशुद्ध झाला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.