‘ सासरी जाईनाच नवरी ‘ , लग्न आहे का अपहरण ? : पहा व्हिडीओ

Spread the love

लग्न लागल्यानंतर नवरीला तिच्या सासरी पाठवताना अनेक जणांना अश्रू अनावर होतात. आपली लाडकी लेक नवीन घरी नवीन कुटुंबात नवीन लोकांच्या सहवासात जाणार तिथे तिचे कसे होईल याची चिंता तिच्या वडिलांना लागून असते. बहुतांश सर्वच ठिकाणी मुलीच्या वडिलांना आणि आईला तसेच भावांना देखील अश्रू अनावर होतात मात्र सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून एक नवरी लग्न लागल्यानंतर मी तिकडे जाणारच नाही असा हट्ट करून बसली मात्र अखेर तिच्या कुटुंबियांनी ज्या पद्धतीने तिला सासरी पाठवलं त्यावर अनेक नागरिकांनी हा ‘ अपहरण ‘ प्रकार आहे असे म्हटलेले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही नवरी तिला सासरी पाठवण्याच्या वेळी जास्तच भावनिक झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आणि ती काही केल्या तिच्या घरी जाण्यास तयार होत नव्हती. जाणारच नाही असा हट्ट ती घेऊन बसली आणि बाहेरच्या व्यक्तीनी तिला अनेकदा समजावून पाहिले मात्र तिचा हट्ट काही कमी होत नव्हता त्यानंतर अखेर माहेरची मंडळी देखील तिला वैतागली आणि त्यांनी एकीकडून तिचा पाय आणि एकीकडून तिचा हात असे धरून नवऱ्याच्या गाडीपर्यंत नेले .

सदर व्हिडिओ सोशल मीडियावर एका व्यक्तीने शेअर केलेला असून त्याला मोठ्या प्रमाणात पसंती आलेली आहेत कदाचित या तरुणीचे मनाविरुद्ध लग्न झालेले असेल अशा देखील कमेंट येत असून अनेक जणांनी मुलीसाठीच आपल्याला वाईट वाटत आहे असे देखील म्हटले आहे तर काही जणांनी हे लग्न नव्हे तर अपहरण आहे अशा देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.


Spread the love