सोलापूर हादरले.. नववधूच्या कानातील दागिने काढण्यासाठी चोरांनी चक्क …

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा परिसरात घडलेली आहे. पहाटे तीनच्या सुमारास बंगल्यामध्ये प्रवेश करून दरोडेखोरांनी गळ्याला चाकु लावुन निर्दयीपणे कुटुंबातील नववधूसह इतर सदस्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल साडेचार लाखांचा ऐवज लुटला आहे. कानातील दागिने निघत नसल्याने चोरट्यांनी अक्षरश: कात्रीने कान कापून दागिने ओरबाडुन काढले असा देखील प्रकार समोर आला आहे. मंगळवेढा शहर पोलिसात अज्ञात दरोडेखोरांनी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवेढा शहरालगत धर्मागाव रोडवर फिर्यादी मंदाकिनी अंबादास सावंजी या त्यांच्या बंगल्यात राहतात. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता अज्ञात सहा दरोडेखोरांनी कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला त्यानंतर फिर्यादीच्या गळ्याला चाकु लावुन नववधू व इतर व्यक्तींच्या अंगावरील दागिने ओरबाडून चोरटे पसार झाले.

चोरटे साधारण 30 ते 35 वयोगटातील होते आणि त्यांच्या हातात लोखंडी सळ्या होत्या. चोरट्यांनी महिलांच्या कानातील दागिने निघत नसल्याने चक्क कात्रीच्या साह्याने कट मारून दागिने काढून घेतले. सदर घटनेत सोन्याचे दागिने, दोन मोबाईल, कपाटातील रोख रक्कम असा तब्बल साडेचार लाखांचा ऐवज लुटून चोर पसार झाले. लग्नात आलेल्या महागड्या साड्या देखील चोर घेऊन गेले.

चोर पसार झाल्यानंतर कुटुंबियांनी आरडाओरडा करत शेजार्‍यांना मोबाईलवर याची माहिती देत बोलावून घेतले आणि स्वतःची सुटका करून घेतली. अतिरिक्त पोलिस अधिकारी हिम्मतराव जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. अज्ञात सहा चोरट्यांच्या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू आहे.


Spread the love