
सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून उत्तरप्रदेश येथील ही घटना आहे. एक प्रेयसी प्रियकराला भेटण्यासाठी रात्री त्याच्या घरी गेली होती. परिसरातील नागरिकांना याचा अंदाज असल्याने त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली आणि त्यांना रंगेहात पकडले. नागरिक आणि तिच्या बहिणीचा पती जेव्हा या तरुणीच्या घरात घुसले तेव्हा ती तरुणी आणि तो दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले होते.
मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडलेली असून जालोंन जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. कानपूर ग्रामीण भागातील एक तरुणी तिच्या मोठ्या बहिणीच्या सासरच्या घरी आलेली होती आणि त्याच गावात तिचा प्रियकर देखील राहत होता. संध्याकाळी उशिरा ती त्याला भेटायला गेली त्यावेळी तिच्या बहिणीच्या पतीला हा प्रकार कळला आणि तो गावकऱ्यांना सोबत घटनास्थळी पोहोचला त्यावेळी ते आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले.
गावातील काही लोकांनी त्यांना पकडून घरी आणले आणि बहिणीच्या पतीने सासूला फोन करून बोलावले त्यानंतर तरुणाच्या आई-वडिलांना देखील तिथे बोलावण्यात आले. दोघेही समंजस आणि एकमेकाच्या नात्यातीलच असल्याने लग्नाचा निर्णय घेण्यात आला आणि गावातील एका जुन्या मंदिरात दोघांचेही लग्न लावून देण्यात आले. सदर प्रकरणी पोलिसांकडे कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही मात्र या अनोख्या लग्नाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे .