
महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आली असून नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे एका मंदिरातून हनुमानाची एक किलो पितळाची गदा आणि अगरबत्तीचे पात्र चोरीला गेले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या चोराने चोरी करण्यापूर्वी हनुमानाला नमस्कार केला तेथील प्रसादही खाल्ला आणि त्यानंतर झोळीमध्ये तो ही गदा घेऊन पसार झालेला होता त्यानंतर मात्र त्याने आपल्याला हनुमानाचा साक्षात्कार झालेला असून ही गदा मंदिरात आणून ठेवली आणि पोलिसांनी त्यानंतर त्याला ताब्यात घेतले.
उपलब्ध माहितीनुसार, संदीप परसराम लक्षणे ( वय 42 ) असे या चोरट्याचे नाव असून शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास पुजार्याने मंदिर उघडले त्यावेळी तिथे गदा आणि अगरबत्ती पात्र दिसून आले नाही त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यामध्ये हा चोरटा दिसून आलेला होता. पोलिस त्याचा शोध घेत असतानाच तो स्वतःहून पहिल्यांदा गदा घेऊन मंदिरात आला आणि त्याने आपल्याला हनुमंताचा साक्षात्कार झालेला आहे म्हणून आपण ही गदा परत ठेवत आहोत असे म्हटले मात्र त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.