हाय हॅलोचे रिलेशन पुढे चक्क शरीरसुखाच्या मागणीपर्यंत , पुण्यातील प्रकरण

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुण्यात समोर आलेली असून महिनेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा स्वरूपाचे व्हाट्सअप मेसेज करून तसेच तिला फोन करून तिचा विनयभंग करण्यात आलेला आहे. जुलै 2022 पासून तर फेब्रुवारी 2023 पर्यंत आरोपी तिला सतत त्रास देत होता असे महिलेचे म्हणणे असून निगडी प्राधिकरण येथे ही घटना घडलेली आहे. पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रमेश दशरथ वागदरे ( वय 42 तालुका पडळवाडी खेड ) असे आरोपीचे नाव असून फिर्यादी यांच्यावर एक केस दाखल असल्याने त्यासाठी मदत करतो असे म्हणत तो सतत त्यांना हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड नाईट असे मेसेज करत त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा स्वरूपाने शरीरसुखाची देखील मागणी करायचा. माझे पोलीस स्टेशनमध्ये चांगले कॉन्टॅक्ट आहेत तुझ्यावर केस दाखल करतो असे म्हणत त्याने तक्रारदार महिला यांना धमकावले असल्याचे त्यांनी म्हटलेले असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत .


Spread the love