
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून भंडारा जिल्ह्यात एका तरुणीसोबत लॉजमध्ये गेलेल्या तरुणाचा अचानकपणे मृत्यू झालेला आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याचा मृतदेह आढळून आलेला असून भंडारा शहरात असलेल्या हिरणवार लॉज येथील ही घटना आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मयत तरुण हा नागपूरच्या कामठी रहिवासी असून त्याचे वय 23 वर्षे आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जरफाडा येथील एका 23 वर्षीय तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते त्यानंतर त्यांनी एकत्र भेटण्यासाठी भंडारा शहर गाठलेले होते. 20 ऑगस्ट रोजी पर्यटन स्थळ फिरून झाल्यानंतर त्यांनी खरेदी करून जेवण केले आणि हिरणवार लॉजमध्ये मुक्कामी थांबलेले होते.
आपल्यासोबत प्रेयसी आहे त्यामुळे त्याने शक्तीवर्धक गोळ्या घेतलेल्या होत्या. रात्री दोघेही सोबत झोपल्यानंतर पहाटेच्या सुमारास तिला झोपेतून जाग आली त्यावेळी तिने प्रियकराला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने काहीही हालचाल केली नाही. घाबरलेल्या मुलीने हॉटेल लॉजमधील कर्मचाऱ्यांना आवाज दिला त्यानंतर त्याला भंडारातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झालेला होता.