
पुणे शहरात प्रसिद्ध असलेल्या हॉटेल वैशालीचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आलेला असून हॉटेलच्या मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी त्यांच्या पतीच्या विरोधात गंभीर आरोप केलेले आहेत . आपला पती चार वर्षाच्या मुलीला घेऊन गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहे. आपल्या मुलीला शोधून द्यावे आणि पतीला तात्काळ अटक करावी अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे.
पुणे शहरातील प्रसिद्ध असलेले हॉटेल वैशाली हे गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कलहामुळे चर्चेत आलेले असून हॉटेल वैशालीची पावर ऑफ ॲटर्नी बंदुकीचा धाक दाखवून पतीने आपल्या नावावर करून घेतली असा आरोप हॉटेलच्या मालकीण असलेल्या निकिता शेट्टी यांनी केलेला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कौटुंबिक छळाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नव्याने हा आरोप निकिता यांच्याकडून करण्यात आलेला आहे.
निकिता यांनी पुणे पोलिसांकडे आपले म्हणणे मांडताना , ‘ दोन महिन्यांपासून मी माझ्या मुलीचा चेहरा देखील पाहिलेला नाही. तिची आणि माझी भेट घडवावी अशी माझी इच्छा आहे. 18 जून रोजी मी पोलिसात गुन्हा नोंदवला होता मात्र आता पती माझ्या मुलीला घेऊन फरार झालेला आहे . त्याच्यावर पाच कोटी रुपयांचे कर्ज असून त्याने जबरदस्तीने सर्व संपत्ती हडप केलेली आहे ‘ असे म्हटले आहे .
विश्वजीत विनायकराव जाधव , अभिजीत विनायकराव जाधव, विनायकराव जाधव आणि वैशाली गायकवाड जाधव यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक कलहामुळे हॉटेल वैशाली चर्चेत आहे .