अल्पवयीन मेहुणी पाहिल्यावर दाजीची नियत बदलली , पोलिसांनी केली अटक

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात समोर आलेले असून अल्पवयीन मेहुणी सोबत अश्लील चाळे करणाऱ्या एका मेव्हण्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही वाळूज एमआयडीसी परिसरात राहत असून तिची बहीण संगीता हिचे अनिल नावाच्या एका व्यक्तीसोबत लग्न झालेले आहे. अनिल अंभोरे असे आरोपीचे नाव असून तो त्याची सासुरवाडी असलेल्या वाळूज इथे अधूनमधून येत असायचा. 24 मे रोजी तक्रारदार अल्पवयीन मुलगी हिचे आई-वडील कामासाठी बाहेर पडलेले होते त्यावेळी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी सासुरवाडीला आलेला होता. दुपारी एक वाजता त्याने अल्पवयीन मेहुणीला खाली बोलावून पिण्यासाठी पाणी मागितले यावेळी त्यांनी तिचा हात पकडला आणि तिला ओढून जवळ घेतले.

सदर प्रकाराने पीडित मुलगी ही घाबरून गेली आणि तिने त्याला विरोध सुरू केला त्यावेळी तिच्या विरोधाला न जुमानता हा तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता त्यानंतर पीडित मुलीने आजीला आवाज दिला म्हणून आजी आली आणि तिने मुलीची सुटका केली. आरोपीची पत्नी घरी आली त्यावेळी या मुलीने घडलेला प्रकार सांगितला मात्र बदनामी नको म्हणून या घटनेची वाच्यता करण्यात आली नाही मात्र अखेर पीडित मुलीने तिच्या आईला याप्रकरणी कल्पना दिली आणि एमआयडीसी वाळूज पोलिसात या प्रकरणी जावई अनिल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .


Spread the love