
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर जनतेने बोलले पाहिजे. राज्यकर्ते तर तमाशा करतच आहेतच पण नागरिकांना त्याची काहीच पडलेली नाही. जोपर्यंत हे चालेल तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होणार नाही असे म्हटले आहे सोबतच दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याच्या निर्णयावर देखील त्यांनी टीका केली असून दहीहंडीला दर्जा दिला आहे तर आता मंगळागौरीलाही साहसी खेळाचा दर्जा असे म्हणत सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.
शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्याची विश्रांती घेतल्यावर मंगळवारी मुंबईत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते यावेळी त्यांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा गट या दोघांनाही आपल्या निशाण्यावर घेतले. मनसेवर होत असलेली टीका यावर देखील त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले त्यावेळी टोलबाबत केलेल्या आंदोलनावरून मनसे आंदोलन अर्धवट सोडते असा आरोप करण्यात आला होता मात्र तो चुकीचा आहे. मनसे कुठलेही आंदोलन अपूर्ण सोडत नाही असेही सांगितले.
टोलमुक्तीचे आश्वासन हे भाजपने दिले होते मात्र ते मनसेने पूर्ण केले. टोलचा पैसा कुठे जातो हा मूळ प्रश्न होता मात्र त्याची उत्तरे कोणत्याच सरकारने दिले नाही म्हणजे या टोलचा पैसा सगळ्या पक्षांना जातो म्हणून टोलबाबत प्रश्न विचारले जात नाहीत असे देखील ते म्हणाले सोबतच मनसेच्या आंदोलनानंतर 92% ठिकाणावरील भोंगे बंद झाले आहे असेही ते म्हणाले.