
राज्यातील सध्याच्या सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आपले मत प्रगट न करण्याचा सल्ला दिला होता त्यानंतर पुढे जात राज ठाकरे यांनी ‘ पुढील पाच महिने मनसेच्या कार्यकर्त्यांनी 24 तास काम केले पाहिजे. तुम्हाला विजयाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी माझी आहे. मी तुम्हाला विधानसभेतही सत्तेत घेऊन जाईल. लोकसभेत आपले खासदार निवडून येतील पण तुम्हालाच खुर्चीवर बसलेले मला पहायचे आहे. मी बसणार नाही ‘ असे म्हटलेले आहे. राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण स्वबळावर लढणार आहोत असेदेखील संकेत त्यांनी दिलेले असल्याने मनसे येत्या काळात अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक घेतली होती त्या वेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या राज्यातील राजकारण खालच्या थराला गेले आहे. उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळते असे म्हटले जाते पण कसली सहानुभूती आणि कसलं काय कारण त्यांनी जनतेशी प्रतारणा केलेली आहे. आपल्याला पुढच्या प्रत्येक निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवायचे आहे. येत्या दिवाळीत आपल्या चिन्हाचे सगळीकडे कंदील लागले पाहिजे , ‘ असे देखील ते पुढे म्हणाले.