
बालगृहातील मुलेही देखील आता गुन्हेगारांच्या निशाण्यावर असून असेच एक प्रकरण उस्मानाबाद येथे समोर आलेले आहे. उस्मानाबाद शहरातील सांजा चौक भागातील बालकांचे बनावट कागदपत्रांच्या आधारे अपहरण केल्याप्रकरणी एका महिलेसह दोन पुरुषांना अटक करण्यात आलेली आहे. बालगृहातून आरोपी बालकांना घेऊन चोरीसारख्या घटनांमध्ये त्यांचा वापर हे दाम्पत्य करायचे अशी माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुरुवारी दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, आंध्रप्रदेश येथील अनोळखी इसमांनी सहा सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सांजा चौक येथील बालगृहात असलेल्या बालकांना बनावट ओळखपत्र आणि जन्मदाखला च्या मदतीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता सदर प्रकरणी बालकल्याण समिती अध्यक्ष विजयकुमार माने यांनी तक्रार दिली आणि आनंदनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा सप्टेंबर रोजी सांजा चौक परिसरातून एस लक्ष्मी कृष्णा ( राहणार कुर्नुल आंध्र प्रदेश ) या महिलेला ताब्यात घेण्यात आले असून तिच्याकडे बनावट आधार कार्डमी चोरीचा माल आणि रोख रक्कम 42000 आढळून आलेली आहे त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे तिचा साथीदार यश कृष्णा उर्फ गंगाधर सुभाषराव व एस साई व्यंकटेश यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे .
आरोपी लहान मुलांचे अपहरण करून त्यांना चोरीसारख्या गुन्ह्यात वापरून घेतात मात्र पोलिसांनी पकडल्यानंतर पुन्हा त्यांना बालगृहात पाठवले जाते त्यानंतर पुन्हा हे आरोपी दोन चार महिन्यांनी परत बालगृहात यायचे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे आम्ही त्यांचे पालक आहोत असे सांगून घेऊन जायचे आणि पुन्हा त्यांना चोरीच्या उद्योगात लोटायचे अशाच पद्धतीने आरोपींनी यापूर्वीदेखील दोन जणांना नेलेले आहे मात्र या वेळी एका मुलीला घेऊन जात असताना त्यांना पकडण्यात आले.