‘ तू अंधभक्त आहेस म्हणत कुकरचे झाकण फेकून मारले ‘, कामगारावर गुन्हा दाखल

Spread the love

अनेकदा जिवलग मित्र असलेल्या व्यक्तींमध्ये देखील राजकीय मतभेद असतात मात्र त्या त्या ठिकाणी विषय संपवून संबंध खराब होऊ न देणे अशा स्वरूपाचे बहुतांश मित्रांचे वर्तन असते मात्र गेल्या काही वर्षांपासून राजकीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालेले असल्याने त्यातून वादाचे देखील प्रकार घडलेले आहेत . अशीच एक घटना कल्याण येथे समोर आली असून राजकीय वादावादी झाल्यानंतर एका व्यक्तीने दुसऱ्याच्या डोक्यात कुकरचे झाकण मारुन त्याला जखमी केलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कल्याणमधील भांडी विक्री करणाऱ्या दुकानात देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा सुरू होती त्यावेळी एक व्यक्ती सरकारची बाजू मांडत होता तर दुसरा मात्र विरोधी पक्षाची बाजू जोरदारपणे मांडत होता त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि संतप्त झालेल्या एका व्यक्तीने ‘ तु अंधभक्त आहेस ‘ असे म्हणून दुकानातील कामगाराला कुकरचे झाकण फेकून मारले त्यामध्ये धीरज पांडे नावाचा तरुण जखमी झालेला आहे.

झाकण फेकून मारणारा दुसरा कामगार मनीष गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. भांडी विक्रीच्या एका बाजारपेठेत या दोघांचे देशावर किती कर्ज आहे ? बजेटमध्ये काय आहे ? देशात नेमकी परिस्थिती काय आहे ? यावर ही चर्चा सुरू होती. धीरज पांडे हा केंद्र सरकारची बाजू मोठ्या प्रमाणात लावून धरत होता तर मनीष गुप्ता सध्या देशात बेरोजगारी महागाई यावर बोलत होता अन त्यातून त्यांच्यात वाद झाला. मनीष गुप्ता याने धीरज पांडे यांच्या डोक्यात कुकरचे झाकण फेकून मारले. धीरज रक्तबंबाळ झाल्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले आणि आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .


Spread the love