भर कार्यक्रमात शिल्पा शेट्टी हिचे घेतले होते चुंबन , न्यायालय म्हणाले की ..

Spread the love

2007 साली मुंबई येथे एका कार्यक्रमात हॉलिवूड सुपरस्टार रीचर्ड गेरे याने एका सार्वजनिक कार्यक्रमात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या गालावर चुंबन घेतले होते, या प्रकरणी करण्यात आलेल्या प्रकरणातून न्यायालयाने तिची अश्लीलता पसरवल्या प्रकरणी केलेल्या आरोपातून मुक्तता केलेली आहे. प्राथमिक दृष्ट्या रीचर्ड गेरे यांच्या कृत्याला बळी पडली असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले असल्याने सदर प्रकरणी शिल्पा शेट्टी ही पीडिता असल्याचे दिसते.

महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 18 जानेवारी रोजी शिल्पा शेट्टीची मुक्तता केली आहे मात्र सोमवारी निकालाची प्रत उपलब्ध करण्यात आली त्यानुसार 2007 मध्ये गेरे आणि शेट्टी हे एड्सबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यावेळी रीचर्ड गेरे याने हजारो लोकांच्या समोर शिल्पा शेट्टी हिला जवळ ओढत तिच्या गालाचे चुंबन घेतले होते. सदर घटनेबाबत देशातील नागरिकांनी शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात याप्रकरणी एका देखील केली आणि त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला होता.

शिल्पा शेट्टी हिने गेरे याच्या या कृत्याला विरोध केला नाही त्यामुळे तीदेखील या कृत्यात सहभागी आहे असे तक्रारदाराचे म्हणणे होते मात्र यामुळे या कटात सामील होती असे म्हणणे सिद्ध होत नाही असे म्हणत शिल्पा शेट्टी हिची आरोप मुक्तता करण्यात आली आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की आरोपी शिल्पा शेट्टी ही आरोपी क्रमांक एक रीचर्ड गेरे याच्या कृत्याची बळी पडली असे दिसते. कथित गुन्ह्याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीत एकही घटक न्यायालयाच्या समाधान करणारा नाही त्यामुळे शिल्पा शेट्टी ही आरोपमुक्त करण्यात आलेली आहे.


Spread the love