
महाराष्ट्रातील एका शासकीय कार्यालयात सहकारी महिलेसोबत अश्लील भाषेत संभाषण करून तिला शरीरसंबंधाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीतील गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शासकीय कार्यालयात तीन मे रोजी घडलेला असून वरिष्ठ पुरुष सहकाऱ्याच्या वृत्तीत त्यानंतर देखील काहीही बदल झाला नाही म्हणून अखेर महिलेने एक महिना उलटल्यानंतर पोलिसात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , विजय पुंडलिकराव कविटकर ( वय 45 वर्ष राहणार चैतन्य कॉलनी) असे आरोपीचे नाव असून तीन जून रोजी त्याच्या विरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित महिला आणि आरोपी हे एकाच कार्यालयात काम करत असून सातत्याने तो महिलेसोबत शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करत असायचा त्यामध्ये जाता येता धक्का देणे अश्लील भाषेत दुहेरी अर्थाने निघतील अशी वक्तव्य करणे याचा महिलेला त्रास होत होता . त्याचे ऐकले नाही तर वरिष्ठांकडे कसुरी अहवाल पाठवून तो कारवाईची धमकी द्यायचा असे देखील महिलेने म्हटले आहे.
तीन मे रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास महिला कार्यालयातून घरी जात असताना आरोपीने दुसऱ्या एका प्रवेशद्वारासमोरून तिचा पाठलाग केला आणि तिला थांबवत तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. पीडित महिला घाबरून गेल्यानंतर घरी पोहोचली मात्र तिने भीतीपोटी पोलिसात तक्रार दिली नाही . आरोपीला पश्चाताप होईल आणि यापुढे आपल्याला त्रास होणार नाही अशी तिची धारणा होती मात्र तरीदेखील काहीही आरोपीत कुठलीही सुधारणा होत नसल्याने अखेर तिने तीन जून रोजी गाडगे नगर पोलीस ठाणे गाठत त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.