महाराष्ट्र हादरला.. हातात चाकू घेऊनच ‘ तो ‘ घरात घुसला, दोन खून तर तब्बल इतके जखमी

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून भिवंडी इथे शुक्रवारी एका माथेफिरू व्यक्तीने सहा जणांवर चाकूने हल्ला केला. त्याच्या या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तर चार जण जखमी झाले आहे. भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील खान कंपाऊंड गैबी नगर येथील रहेमनीया मस्जिद परिसरात ही घटना घडली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, अन्सार उलहक्क अन्सारी असे हल्ला करणाऱ्या माथेफेरूचे नाव असून या हल्ल्यात कमरुजमा मोहम्मद इस्लाम (वय 42) व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान (वय 29) या दोघांचा मृत्यू झाला आहे .सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी याने कमरुजम्मा अन्सारी यांच्या घरात शिरून चाकूने हल्ला केला. घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारा इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर हा त्याठिकाणी आला.

सदर माथेफिरू हा कोणाचेच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने घरातील कमरुजमाची पत्नी हसीनाबानो, मुले रेहान, आरिफा व आरीबा यांच्यावर सुद्धा चाकूने हल्ला करीत सर्वांना जखमी केले आणि तेथून फरार झाला. नागरिकांनी त्याला पकडले आणि घरात कोंडून बाहेरून कडी लावली. या घटनेची माहिती शांतीनगर पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी यास ताब्यात घेतले आहे.

आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी हा परिसरातील मशिदींसाठी देणगी जमा करण्याचे व हिशेब ठेवण्याचे काम करीत होता. आरोपी व तक्रारदार यापूर्वी कोणत्यातरी कारणावरून वाद झाला होता. आमदार महेश चौघुले यांनी रुग्णालयात दाखल होत त्यांनी आरोपीस कठोरात कठोर शासन करण्याची मागणी केली आहे..


Spread the love