देशात अनेक घटना अशा उघडकीस येतात की अल्प काळातच त्या मोठ्या चर्चेचे कारण ठरतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली असून एका लग्न झालेल्या व्यक्तीने त्याच्या पत्नीला अक्षरश: फिल्मी स्टाईलने तिच्या आधीच्या प्रियकराच्या रीतसर लग्न लावून हवाली केले. त्याची पत्नी लग्नाच्या आधीपासूनच एका व्यक्तीवर प्रेम करत होती, त्यामुळे पतीने हा निर्णय घेतला. पंकज असे या पतीचे नाव आहे. कानपुर इथे ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पंकज याने सहा महिन्यांपूर्वी कोमल नावाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर लगेचच त्याच्या पत्नीने सांगितलं होतं, की तिचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे. त्याला हे ऐकून आधी धक्काच बसला मात्र त्याने नीट विचार करून आपल्या पत्नीला लग्नाच्या बंधनातून मोकळं केलं आणि यानंतर स्वतः पुढाकार घेत आपल्या पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिलं.
पत्नी कोमल देखील तिच्या आधीच्या पतीच्या या वागण्यावर खुश होताना म्हणाली की, ‘ मी माझ्या पतीला लग्नानंतर काहीच दिवसात सांगितलं, की मी दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते त्यावर पतीनं म्हटलं, की तू जिथे खूश आहेस ते ठीक आहे ‘ तर दुसरीकडे तिचा आधीचा प्रियकर ज्याला कोमलचं लग्न झाल्यापासून त्याला सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं तो देखील अतिशय आनंदात आहे.