उत्तर प्रदेशातील गावात झालेल्या भांडणाचा राग काढून त्याचा वचपा महाराष्ट्रात काढण्याच्या उद्देशाने एक प्रकार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील झालेल्या भांडणाचा राग मनात धरून भिवंडी येथे राहणाऱ्या तीन जणांनी संगणमत करून मुंबईतील गोरेगाव येथे राहणाऱ्या सज्जन आली शब्बिर आली फकीर ( वय वीस ) याला एका महिलेच्या मैत्रीत पाडून भिवंडी येथे येण्यास भाग पाडले आणि तिथे आल्यानंतर त्याला डांबून ठेवत त्यांच्या एका नातलगाकडे खंडणीची मागणी करण्यात आली असून सज्जन याची मित्रासोबत सुटका केली आहे. सदर गुन्ह्यात एका महिलेचा देखील समावेश आहे.
सज्जन आलि याचे उत्तर प्रदेश येथील एका गावात राहणाऱ्या व्यक्तीसोबत भांडण झाले होते. त्याचा राग मनात असल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी आरोपी लाल मोहम्मद फकीर, शकील मोहम्मद फकीर, नेहालाल मोहम्मद फकीर ( सर्वजण राहणार भिवंडी ) यांनी त्याच्या अपहरणाचा कट रचला. सज्जन याचे अपहरण करून त्याच्या एका नातेवाइकाकडून खंडणी वसुलीचा डाव या तिघांनी आखला होता.
सज्जन याला आपल्या जाळ्यात अडकविण्याचा उद्देशाने त्यांनी एक नवीन सीम कार्ड खरेदी केले त्यातून इंदू नावाने सज्जनला 13 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान मेसेज केले व अश्लील संभाषण केले आणि त्यातून सज्जन याला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्याला शरीरसंबंधाचे आमिष दाखवून 4 फेब्रुवारी रोजी भिवंडी येथील नारपोली येथे बोलावून घेतले.
सज्जन रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मित्र असलेला शमीम याच्यासोबत भिवंडी येथे आला त्याच वेळी आरोपीनी त्याचे अपहरण केले आणि रात्री साडेअकरा वाजता लाल महंमद याने त्याचा भाऊ कलाम याच्या हॉटेलमध्ये या दोन्ही मित्रांना डांबून ठेवले आणि त्याच्या नातेवाईकांकडे वीस हजार रुपयांची खंडणी मागितली.
सज्जनची आई, भाऊ आणि अरमान असलम यांच्याकडे तसेच त्याचा मालक असलेल्या बाबुशेठ यांच्याकडे गुगल पे वरून आरोपींनी ही खंडणी मागितली होती. प्रकरण पोलिसात जातात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांच्याही मुसक्या आवळल्या असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नीलेश बडाख हे करत आहेत. आरोपींना दहा फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे .