महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना धुळे जिल्ह्यात समोर आलेली असून धुळे येथील पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात 2018 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी आणि मुख्य साक्षीदाराला एका महिलेने पैशाचे आमिष दाखवून फितूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर प्रकरणी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
२०१८ मध्ये देवपुरा येथील जी टी पी स्टॉप इथे एका पिता पुत्राचा खून झाला होता याप्रकरणी पोलिसांनी भा द वि 302 307 341 120 या अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटना घडली त्यावेळी हरीश अनिल शिंदे ( वय 22 राहणार दोंदे कॉलनी दत्त मंदिर धुळे ) हा पान टपरी चालक त्यावेळी प्रत्यक्षदर्शी आणि महत्त्वाचा साक्षीदार होता.
महिलेने त्याला खोटी साक्ष द्यावी यासाठी पैशाचे आमिष दाखवले. निजामपुरला भेटण्यासाठी यावे म्हणून फोन केला. 24 ऑक्टोबर २०२१ रोजी ही घटना घडलेली होती. हरीश शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत सदर महिलेच्या विरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात भादवि 214 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.