महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून अकोला शहरात ही घटना उघडकीस आली आहे. पतीपासून विभक्त राहत असलेल्या 27 वर्षीय महिलेला 17 वर्षीय मुलासोबतचे प्रेमसंबंध जड गेले असून मुलगा अल्पवयीन असल्याने कायदेशीरदृष्ट्या त्याचा लैंगिक छळ केल्याचा ठपका महिलेवर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करत तिला बेड्या ठोकल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, अकोला शहरातील किर्ती नगर खदान परिसरातील ही घटना असून सुरुवातीला महिलेने पुण्याला राहणाऱ्या आपल्याकडे नवऱ्याकडे मुलगा पैसे आणायला गेल्याचं पोलिसांना सांगितलं होत मात्र कसून चौकशी केली असता तिने 17 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली देत काही काळ आपण त्याच्याबरोबर राहिल्याचंही पोलिसांना सांगितलं आहे.
संबंधित महिला आणि अल्पवयीन मुलगा एकाच ठिकाणी काम करत होते. तिथे दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळल्याची माहिती आहे. ते दोघं एकत्र फिरत असत. पण वयात जवळपास दहा वर्षांचं अंतर. त्यामुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध असतील, असा संशयही कोणाला नव्हता. आरोपी महिला आपल्या बहिणीच्या सात वर्षांच्या मुलीसोबत राहत होती मात्र एका रात्री झोपलेल्या भाचीला घरात एकटी सोडून ती पसार झाली आणि या प्रकरणाचं बिंग फुटलं.
अकोला शहरातील खदान परिसरात राहणारा संबंधित 17 वर्षीय मुलगा 31 जानेवारी 2022 रोजी घरातून रागारागाने निघून गेला होता. त्यामुळे त्याच्या पालकांनी खदान पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असतानाच 9 फेब्रुवारी 2022 रोजी तो घरी आला आणि त्यांचे हे प्रेमप्रकरण समोर आले. अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली खदान पोलिसांनी तिच्याविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत.