महाराष्ट्रात मुलीने वार करून वडिलांची हत्या केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आली होती. पोलीस तपास जे समोर आले ते ऐकून पोलिसही हादरून गेले आहेत . इचलकरंजी इथे ही घटना घडली होती. त्यात प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानेच वडिलांची मुलीने हत्या केली होती. विशेष म्हणजे याला मुलीच्या आईची देखील साथ असल्याची बाब पुढे आली आहे .
उपलब्ध माहितीनुसार , कबनूर येथील गांधी विकासनगरातील शांतिनाथ केटकाळे यांचा मंगळवारी (ता. २२) रात्रीच्या सुमारास निर्घृण खून झाला होता. लोखंडी कटावणी व बॅट तसेच चाकूने वार करत खून करून त्यांची पत्नी सुजाता आणि मोठी मुलगी साक्षी शिवाजीनगर पोलिसांत स्वत:हून हजर झाल्या होत्या .
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र जखमी केटकाळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. सुजाता शांतिनाथ केटकाळे (वय ३६) आणि साक्षी शांतिनाथ केटकाळे (वय २१) यांना अटक करून न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोघींना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे .
शांतिनाथ केटकाळे यांची पत्नी सुजाता यांचे तसेच मुलगी साक्षीचे बाहेर प्रेमसंबंध होते आणि यावरून घरात वारंवार वाद होई. सोमवारी साक्षीला लग्नासाठी स्थळाची पाहणी झाली होती त्यामुळे मंगळवारी दिवसभर वादच सुरू होता. यातून रात्री चिडून दोघींनी बॅट, चाकू, लोखंडी कटावणीने शांतिनाथ यांच्यावर राहत्या घरात हल्ला केला. त्यांच्या डोक्यात वर्मी घाव बसून त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. केटकाळे यांच्या आणखी दोन अल्पवयीन मुलींना नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. आज दोघींना येथील न्यायालयात हजर केले असता २८ फेब्रुवारीपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.