महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून पोलीस जवानाने एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर वेळोवेळी अत्याचार करून दुसरी सोबतच लग्न केल्याची घटना जालना जिल्ह्यात गुरुवारी सकाळी उघडकीला आली आहे. पंकज मगर ( राहणार वर्धा ) असे संशयित आरोपीचे नाव असून पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही जालना येथे कार्यरत असून आरोपी पंकज मगर हा पुणे राज्य राखीव दलाचा जवान आहे. तो मूळचा वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असून पीडित महिला आणि आरोपी दोघेही वेगवेगळ्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. औरंगाबादमधील एका खाजगी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात ओळख झाल्यानंतर या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले होते.
दोघांपैकी पीडित महिला ही शासकीय सेवेमध्ये आधी नोकरीला लागली तर पंकज मगर हा पुणे राज्य राखीव पोलीस दलात नंतर रुजू झाला त्यानंतरही दोघांमध्ये प्रेमसंबंध कायम होते यातूनच त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत पीडित महिलेच्या शासकीय निवासस्थानी जाऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले मात्र लग्नाची वेळ आल्यानंतर त्याने दुसऱ्याच मुलीशी तिला न सांगता लग्न केले.
आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पंकज मगर याच्याविरोधात जालना तालुका पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पंकज मगर याचा डिसेंबर 2021 मध्ये एका दुसऱ्या मुलीशी विवाह झाल्याची माहिती पीडित महिलेला समजली होती आणि त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली .