महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली असून ठाणे जिल्ह्यात पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या समस्येत संशयातून गीता यादव ( वय 36 ) या महिलेने उकळते तूप मनीषा पांडे ( वय 30 ) हिच्या अंगावर ओतून तिची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे. मनीषा यांना रुग्णालयात दाखल केले होते मात्र त्यांचा त्यात मृत्यू झाला आणि आणि त्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, लोकमान्यनगर येथील पाडा क्रमांक चार येथे मनीषा या त्यांच्या तीन मुलांसोबत राहत होत्या तर ज्ञानेश्वर नगर भागात गीता यादव ही महिला देखील राहते. आपल्या पतीचे मनीषा तिच्या सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय गीता हिच्या मनात होता आणि त्यातून त्यांची भांडणे देखील झाली होती.
23 जानेवारीला मनीषा कामानिमित्त माहेरी गेलेल्या असताना गीता यांनी मोबाईलवर फोन करत जेवण बनवण्यासाठी घरी ये असे सांगितले त्यामुळे मनीषा त्यांच्या लोकमान्यनगर येथील घरी आल्या. घरी जेवण बनवत असताना संतप्त झालेली गीता तिथे येऊन धडकली आणि तिने मनीषा यांच्या अंगावर तूप ओतले त्यामुळे मनीषा यांच्या शरीराच्या सर्व भागावर गंभीर दुखापत झाली. स्थानिक रहिवाशांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर 6 मार्च रोजी मनीषा यांचा मृत्यू झाला आणि आणि गीता हिच्याविरोधात मनीषा यांच्या आईने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.