पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे अशीच एक घटना पाषाण इथे उघडकीला आली असून पाषाण येथील टेकडीवर फिरायला आलेल्या एका प्रेमी युगुलाला तीन चोरट्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत फोन पे खात्यामधून त्यांच्या खात्यात तब्बल 76 हजार रुपये ट्रान्सफर करायला सांगत लुबाडले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पाषाण येथील एका टेकडीवर सुस खिंडीत शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजता ही घटना घडलेली आहे. फिर्यादी आणि त्याची मैत्रीण हे पाषाण टेकडीवर फिरून एके ठिकाणी बसलेले असताना तिथे तीन जण आले त्यांनी तुम्ही कुठले इथे काय करता ? असे म्हणून त्यांना मारहाण केली आणि दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.
प्रेमीयुगुल हे या प्रकाराने घाबरून गेले त्यानंतर या टोळक्याने त्यांना त्यांच्या मोबाईलवरून चाळीस हजार रुपये आणि प्रेयसीच्या मोबाईलवरून 36 हजार रुपये असे एकूण 76 हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करायला लावले आणि त्यानंतर ते पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक कपिल भालेराव अधिक तपास करत असल्याचे समजते.