संसार म्हटलं की एकमेकांवर विश्वास हवाच मात्र अनेकदा गैरसमजामधून एकदा संशयाचे भूत डोक्यात शिरले की ते लवकर जात नाही त्यातून अनेकदा गुन्हेगारी स्वरूपाची देखील कृत्ये केली जातात अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरात घडलेली आहे.चारित्र्यावर संशय घेत पतीने चक्क कुर्हाडीने हल्ला करत आपल्या पत्नीचा खून केला असून किनवट पोलीस स्टेशन हद्दीत पारडी खुर्द येथे शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मयत विवाहितेचे नाव चंद्रकला गमेवाढ ( वय 25 गमेवाडी ) असे असून पोलिसांनी पतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकला यांना एक मुलगी आणि एक मुलगा असून दहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह श्यामसुंदर गमेवाढ याच्यासोबत झाला होता. अधून मधून पत्नी माहेरी जात असल्याने पति याच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळू लागला आणि त्यातूनच झालेल्या भांडणातून त्याने पत्नीच्या डोक्यात आणि मानेवर तसेच हातावर कुऱ्हाडीने वार करत तिचा खून केला.
तिच्या खुनाचे वृत्त समजतात डीवायएसपी विजय डोंगरे, पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके, पोलीस उपनिरीक्षक एम पी सावंत यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून प्रेत उत्तर तपासणीसाठी पाठवून दिले. चंद्रकला यांच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी श्यामसुंदर गमेवाढ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून सदर घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.