महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना राहत्या घरात मांस विक्री करणाऱ्या दोन कुरेशी भावांना धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथून नरडाणा पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत तर पोलिसांच्या कारवाईत 35 किलो मांस आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या मांसाचे तुकडे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे एका घरात गोवंश कत्तल केलेल्या मांसाची विक्री होत असल्याची माहिती नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बेटावद येथील कुरेशी मोहल्ला येथील एका घरात छापा टाकला त्यावेळी घरात मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले.
पोलिसांनी मांस विक्री करणाऱ्या सलीम कुरेशी, सलाम समद कुरेशी या भावांना अटक केली आहे तर 35 किलो वजनाचे मांस आणि कत्तल करण्यात येणारी अवजारे असा एकूण बारा हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. जप्त केलेले मांस हे वंश प्रकारातील आहे का ? यासाठी सदर मांसाचा नमुना पोलिसांनी प्रयोगशाळेत पाठवलेला आहे.