महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना सातारा इथे समोर आलेली असून नोकरी एका 29 वर्षीय महिलेची वैयक्तिक माहिती आणि तिचे मॉर्फ केलेले फोटो केलेले फोटो हे चक्क तिच्या पतीच्या मोबाईल वर पाठवण्यात आलेत . सातारा शहर पोलीस ठाण्यात एका अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा येथे नोकरी करणाऱ्या एका 29 वर्षीय महिलेला कर्ज हवे होते. त्यासाठी तिने एका ऑनलाईनवर ॲपवर आपली माहिती दिली होती मात्र संबंधित व्यक्तीने पीडित महिलेला लोन न देता लोन मिळाले आहे असे सांगितले . त्यानंतर संबंधित व्यक्तीने पीडित महिलेची सर्व वैयक्तिक माहिती जमा केली. ही माहिती आणि पीडित महिलेचे मॉर्फ केलेले फोटो तिच्या पतीच्या मोबाईल क्रमांकावर तसेच तिच्या नातेवाईकांमध्ये देखील त्याने पाठवून दिले.
सदर फोटो परिसरात नातेवाईकांपर्यंत पोहोचल्यानंतर ही बाब पीडित महिलेच्या लक्षात आली आणि तिने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी सात मोबाईलधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे अधिक तपास करत आहेत तर सायबर पोलिस देखील कार्यरत झालेले असून लवकरच काय ते सत्य बाहेर येईल असे सांगण्यात आले आहे.