‘ मोफत धान्य मिळवून देतो ‘ म्हटल्यावर महिला सोबत गेली आणि..

Spread the love

आजकाल फसवेगिरी करण्यासाठी कोण काय शक्कल लढविल याचा काही भरवसा राहिलेला नाही, अशीच एक घटना अकोला येथे उघडकीला आली असून मोफत धान्य मिळवून देतो असे आमिष देत एका वृद्ध महिलेचे 80 हजार रुपयांचे दागिने घेऊन दोन जणांनी पोबारा केला आहे. सिटी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आगार परिसरातील 62 वर्षीय महिला तिच्या नातवासोबत काला चबुतरा येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलीचा डबा घेऊन जात होती. त्यावेळी पांढऱ्या रंगाचे मास्क लावलेल्या दोन भामट्यांनी गांधी चौक येथे मोफत धान्य मिळत आहे, असे सांगून त्यांना गांधी रोडवरील प्रकाश ज्वेलर्स तिथे नेले.

तिथे नेल्यानंतर एक जण आधीच पायरीवर बसलेला होता. एक जणांने महिलेला मोफत रेशन देणाऱ्याला घेऊन येतो तोपर्यंत तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा, असे सांगितले महिलेचा त्याच्यावर झटकन विश्वास बसला. त्यांनी दागिने काढले आणि बॅगमध्ये ठेवत असताना थैलीची गाठ मारतो म्हणून त्याने पिशवी घेतली आणि गाठ बांधण्याच्या नावाखाली दागिने लंपास केले आणि महिलेच्या हातात दगड टाकलेली पिशवी दिली आणि आम्ही परत येतो असे सांगून ते निघून गेले.

बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत म्हणून महिलेने थैलीत पाहिले असता सोन्यातील सोन्याचे सुमारे 85 हजार रुपये किमतीचे दागिने आणि दोन हजार रुपये रोख अशी रक्कम या भामट्यांनी पसार केली होती त्यानंतर पोलिसांकडे धाव घेऊन महिलेने आपली तक्रार दाखल केली.


Spread the love