तब्बल वीस तोळे सोने अन दहा लाख वरदक्षिणा देऊनही..अखेर प्रकरण पोलिसात

Spread the love

अवघ्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या लग्नसोहळ्यात वीस तोळ्यांचे दागिने देऊन आणि तब्बल दहा लाख रुपये वरदक्षिणा देऊन देखील लग्नानंतर दोन महिने व्यवस्थित नोंदवल्यानंतर रुचकर स्वयंपाक करता येत नाही म्हणून विवाहितेला त्रास दिला आणि माहेराहून अजून पंधरा लाख रुपये घेऊन यावेत यासाठी मारहाण केली. अशी तक्रार घटना पुणे जिल्ह्यात उघडकीला आली असून विवाहिता असलेल्या प्रतिक्षा देवेंद्र पारख ( वय 29 राहणार पिंपरी चिंचवड ) यांनी बार्शी शहर पोलिसात सात जणांच्या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

प्रतीक्षा पारख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती देवेंद्र सुनील पारख, सासरा सुनील पारख , सासु शशिकला पारख , दीर चेतन पारख , जाऊ अमृता चेतन पारक ( सर्वजण राहणार पिंपरी चिंचवड पुणे ) नणंद तृप्ती संदीप बोरा, संदीप बोरा ( दोघेही राहणार सुखसागर नगर पुणे ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 15 फेब्रुवारी 2019 रोजी पुणे येथे विवाह झाला होता. या विवाहात प्रतीक्षा यांच्या वडिलांनी पंधरा तोळे सोने तर पतीला पाच तोळ्यांचे लॉकेट आणि आणखी यासह इतर साहित्य देऊन वरदक्षिणा दहा लाख रुपये देखील दिली होती. लग्नानंतर दोन महिने पतीने व्यवस्थित नंदीवाले आणि त्यानंतर घर काम येत नाही म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली. पतीचे कान भरून सासरच्या इतर मंडळी देखील माहेराहून 15 लाख रुपये आणण्यासाठी नवऱ्याला प्रवृत्त केले त्यानंतर पतीने विवाहितेचा छळ सुरू केला.

काही कालावधीनंतर प्रतीक्षा यांना दिवस गेल्याने आणि दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नाहीत म्हणून सासरी छळ सुरू झाला. त्यानंतर त्या माहेरी गेल्या आणि आणि त्यांना मुलगा झाला. तीन महिन्यांनी घेऊन जाणार असे सांगून देखील त्यांनी ते सासरच्या मंडळींनी त्यांना सासरी नेले नाही म्हणून त्या बाळासह सासरी गेल्या असता सासरच्या लोकांनी त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले आणि त्यांना नांदवण्यास नकार दिला त्यानंतर त्या पुन्हा माहेरी परतल्या आणि सध्या एक वर्षापासून माहेरी राहत आहेत. सदर प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका गटकुळ या करत असल्याचे समजते.


Spread the love