कोरोना काळात देशातील आरोग्य व्यवस्थेची चांगलीच पोलखोल झाली होती मात्र कोरोना संकट कमी झाल्यावर देखील आरोग्य व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारी एक घटना मध्यप्रदेश येथे उघडकीला आली असून वृद्ध आईची तब्येत बिघडल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी कुटुंबियांनी रुग्णवाहिका बोलावली मात्र रुग्णवाहिका आलीच नाही आणि अखेर चार मुलींनी आईला खाटेवर उचलून सार्वजनिक आरोग्य केंद्रात आणले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.
दुर्दैवाचा फेरा इथेच संपला नाही तर मृत आईचे शरीर पार्थिव घरी घेऊन जाण्यासाठी शववाहिकादेखील उपलब्ध झाली नाही अखेर नाइलाजाने या चार लेकींनी आईचे पार्थिव खाटेवर टाकून खांद्यावर घेत पाच किलोमीटर पायी चालत घरी परतल्या.
मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील महसूहा गावात हा प्रकार उघडकीला आला असून मुलिया केवट ( वया ८० ) असे मयत महिलेचे नाव असल्याचे समजते. त्यांची तब्येत खालावल्याने नंतर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका तर उपलब्ध झाली नाही मात्र अखेर चार मुलींनी खाटेवर आईला उचलून जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन आल्या मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
कुटुंबातील लोकांनी आता यांना घरी नेण्यासाठी शववाहिका तरी उपलब्ध होईल का ? असा प्रश्न केला असता त्यांना शववाहिका देखील उपलब्ध झाली नाही आणि अखेर आईचे पार्थिव पुन्हा खाटेवर टाकत त्या चार जणी तब्बल पाच किलोमीटर अंतर पायी चालत घरी निघाल्या. वाटेत पोलीस ठाणे देखील होते मात्र कोणीही मदत केली नाही. त्या जात असताना एका व्यक्तीने हा प्रकार या प्रकाराचा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. भाजपशासित राज्यात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे हनन होणे ही गोष्ट नवीन राहिलेली नाही तर आरोग्य व्यवस्थेचे देखील चांगलेच वाभाडे निघालेले पाहायला मिळत आहे.