गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात केंदूर येथे उघडकीला आली असून पत्नीसोबत वाद होत असल्याने पतीने पत्नीचा चाकूने वार करून खून केला आणि त्यानंतर पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला, अशी घटना उघडकीला आलेली आहे. शिक्रापूर पोलिसांनी या पतीला अटक केली असून सदर प्रकरणी तपास सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रामदास उर्फ भाऊ पवार आणि त्याची पत्नी आशा पवार यांच्या सातत्याने वाद होत होते त्यामुळे रामदास त्रस्त झालेले असताना त्यांनी आपली पत्नी आज नाही उद्या सुधारेल अशा आशेने काही बोलले नाहीत मात्र रात्रीच्या सुमारास पुन्हा रामदास यांच्या पत्नी आशा हिच्यासोबत वाद झाला तिने चापट मारली म्हणून त्याने रागाच्या भरात चाकू घेऊन पत्नीच्या तोंडावर, हातावर आणि डोक्यावर वार करत तिचा जीव घेतला आणि चालत चालत पाबळ पोलीस चौकी येथे पोहोचले.
पोलीस चौकी येथे आल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सहायक उपनिरीक्षक अनिल ढेकणे यांना ‘ मी पत्नीचा खून केला आहे ‘ असे सांगितले त्यानंतर पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तेव्हा आशा रामदास पवार ( वय 45 वर्षे राहणार मातंग वस्ती केंदुर तालुका शिरूर ) या महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला असून रामदास पवार याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे.