अल्पवयीन मुलीवर पिता पुत्राचा अत्याचार, पीडितेची आई म्हणतेय की ?

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात शिऊर येथे उघडकीला आली असून 35 वर्षीय महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीवर पितापुत्र गेल्या चार वर्षापासून बळजबरीने अत्याचार करत होते असे पीडितेचे म्हणणे आहे. पीडित महिलेच्या बारा वर्षे मुलीला देखील तिला लज्जा वाटेल अशा पद्धतीने तिच्यासोबत कृत्य करून तिचा विनयभंग केल्याच्या फिर्यादीवरून शुक्रवारी पोलीस ठाण्यात जिब्राईल बाबू शेख, अन्वर जिब्राईल शेख, शहनाज शेख ( राहणार वडजी तालुका वैजापुर ) या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही गेल्या काही दिवसांपासून आरोपी यांच्यासोबत नगर जिल्ह्यात आपल्या दोन मुलींसह ऊस तोडणीच्या कामाला गेली होती. याच दरम्यान आरोपी अन्वर शेख याने पीडित महिलेच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केले. पिडीत मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत अन्वर शेख याचे वडील जिब्राईल इब्राहिम शेख याच्याकडे तक्रार केली असता जिब्राईल इब्राहिम शेख याने सुद्धा फिर्यादीवर बळजबरीने अत्याचार केले.

आरोपींनी आरोपी पिता-पुत्रांनी पीडित महिलेच्या बारा वर्षीय मुलीला सुद्धा लज्जा होईल, असे तिच्यासोबत कृत्य केले आणि तिचा विनयभंग केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी या तिघींनाही डांबून ठेवत त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करून जिवे मारण्याची देखील धमकी दिली, असे फिर्यादीत सांगण्यात आलेले आहे. फिर्यादी यांच्या पंधरा वर्षीय मुलीला दिवस गेल्यानंतर आरोपींनी संगनमत करून तिचा गैरकायद्याने गर्भपात केला. गुन्ह्याचे घटनास्थळ नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर हद्दीत असल्याने प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक हे करत आहेत


Spread the love