विवाहितेला परिसरातील सगळ्या लॉजवर फिरवून नंतर म्हणाला की..

Spread the love

महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असताना पाहायला मिळत आहे अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यात समोर आलेली असून एका 38 वर्षीय विवाहित महिलेचा आंघोळ करतानाचा मोबाईलवर फोटो काढून आरोपीने तिच्यावर अत्याचार केलेले आहेत. पीडित महिलेने त्यानंतर सेनगाव येथील एका व्यक्तीच्या विरोधात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

उपलब्ध माहितीनुसार मारोती शिवाजी कोटकर ( राहणार सरस्वतीनगर सेनगाव ) असे आरोपीचे नाव असून पीडित महिला तिच्या घरी आंघोळ करत असताना आरोपी मारोती कोटकर याने तिचा फोटो काढला त्यानंतर धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार देखील केला.

लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिला हिंगोली येथील डेंटल कॉलेज येथून पळून गेले आणि त्यानंतर तुला फ्लॅट देतो आणि जमीन तुझ्या नावावर करून देतो असे म्हणत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात अनेक वेळा तिच्यावर अत्याचार करण्यात आले. सदर प्रकरणानंतर त्याचा त्रास सहन होत नसल्याने पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत एक एप्रिल रोजी मारुती याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.


Spread the love