‘ समीर वानखेडे मोदींच्याही पुढे निघून गेलेत ‘, नवाब मलिकांनी कोंडीत पकडले

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात समीर वानखडे आणि एनसीबीला चांगल्याच कोंडीत पकडले आहे .जावयाला वाचवण्यासाठी नवाब मलिक एनसीबीवर दबाव आणत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तो पूर्णपणे खोडून काढताना मलिक यांनी आज समीर वानखेडे यांच्यावर आणखी धक्कादायक आरोप केले आहेत

नवाब मलिक काय म्हणाले ?

समीर वानखेडे हे प्राइव्हेट आर्मी चालवत असून किरण गोसावी, भानुशाली, फ्लेचर पटेल, सॅम डिसूझा असे अनेक लोक या प्राइव्हेट आर्मीचे सदस्य आहेत. ही आर्मी निर्दोष लोकांना फसवून हजारो कोटींची वसुली करते. बॉलिवूडमधील कलाकारांकडून अशाच प्रकारे वसुली करण्यात आली आहे. मालदीमध्ये ही वसुली केली गेली आहे. त्यासाठी समीर वानखेडे व त्यांची बहीण यास्मिन वानखेडे स्वत: मालदीवमध्ये गेली होती. समीर वानखेडेला अटक झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट समोर येईल. १८ कोटींच्या वसुलीचे सत्य समोर येईल.

समीर वानखेडे हे इमानदार अधिकारी असल्याचं देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून सांगितलं जात आहे. पण ते वस्तुस्थितीला धरून नाही. वानखेडेंचे फोटो बघा. ते नरेंद्र मोदी यांच्याही पुढं निघून गेले आहेत. वानखेडे हे रोज नवनवे कपडे वापरतात. ते ज्या ब्रँडची शर्ट वापरतात, त्यांची किंमत ५० हजारपेक्षा जास्त असेत. ३० हजारांपासून सुरू होणारे टी-शर्ट वापरतात. ७० हजारांची पँट वापरतात. पाच लाखापर्यंतची वेगवेगळी ब्रँडेड घड्याळं वापरतात, अडीच ते तीन-तीन लाख रुपये किंमतीचे बेल्ट वापरतात. एका इमानदार अधिकाऱ्याला हे कसं परवडतं ? , असा देखील प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.


Spread the love