अखेर झोमॅटोने उशीरा का होईना पण घेतला ‘ तो ‘ निर्णय

Spread the love

देशभरात घरपोच हॉटेलचे जेवण पुरवण्यासाठी झोमॅटोसारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील उपलब्ध करतात मात्र अनेकदा व्यावसायिक हित लक्षात घेत कंपन्यांकडून आपल्याकडील काम करत असलेल्या व्यक्तींची व्यवस्थित माहिती घेतली जात नाही आणि त्यातून चुकीच्या व्यक्तींना देखील नोकरी मिळते आणि त्यातून गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळते, अशीच एक घटना मुंबई येथे झोमॅटोसोबत घडली होती मात्र अखेर झोमॅटोने त्याला कामावरून कमी केलेले आहे.

खुनाच्या आरोपात शिक्षा भोगून आलेला आणि चोरीचा गुन्हा दाखल असलेला मनीष प्रसाद नरसिंग गौडा या गुन्हेगाराला त्याची पार्श्वभूमी न तपासता झोमॅटो कंपनीने फूड डिलिव्हरी बॉय म्हणून कामावर ठेवले होते मात्र त्यानंतर त्याने पुन्हा चोरी केल्यानंतर हा प्रकार समोर आला असून अखेर कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले आहे.

झोमॅटोने त्याला कामावर ठेवले तेव्हा गौडा हा एका डिलिव्हरी बॉयची बॅग घेऊन पळताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मार्च महिन्यात विविध कुरिअर कंपन्या फूड डिलिव्हरी ॲप आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांना डिलिव्हरी बॉयचे चारित्र्य प्रमाणपत्र जमा करणे हे अनिवार्य केले आहे मात्र अनेकदा कंपन्या हेतूपुरस्पर दुर्लक्ष करतात आणि त्यातून असा एखादा प्रकार समोर येतो.


Spread the love