मुंबई येथील एका तरुणाला प्लेबॉय बनण्याच्या नादात चक्क पावणेदोन लाख यांना फटका बसल्याची घटना उघडकीला आलेली आहे. काळाचौकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, काळाचौकी परिसरात राहणारा एक तीस वर्षीय मुलगा एका कंपनीत काम करतो. 13 मार्च रोजी त्याला फेसबुकवर नीलम कुमारी आणि अंजली शर्मा या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. तरुणाने कोणतीही खातरजमा न करता ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि त्यांच्यासोबत बोलण्यास सुरू केली. हळूहळू या तरुणींनी त्याला आपल्या जाळ्यात ओढत त्याच्यासोबत संवाद सुरू केला आणि एके दिवशी त्याला कॅमेरा पुढे नको ते प्रकार करण्यास सांगितले.
सदर प्रकार कथित तरुणींनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आणि त्याचे पैसे मागण्यास त्याला सुरुवात केली अन्यथा हे व्हिडिओ व्हायरल करू अशी देखील धमकी त्याला देण्यात आली आणि त्यानंतर याच तरुणीच्या साथीदारांनी दिल्लीतील सायबर गुन्हे शाखेमधून आपण अरुण सक्सेना बोलत असल्याचे सांगत या मुलींना पकडण्यासाठी तसेच तुमचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल न होऊ देण्यासाठी पैसे मागितले.
सक्सेना याच्यासोबत कुलदीप कुमार नावाचा देखील व्यक्ती होता त्यानंतर संजय सिंग याने युट्युबवर अपलोड होत असलेला व्हिडिओ बंद करण्यासाठी पैसे घेतले. या तीन जणांच्या सोबत गौरव मल्होत्रा, राहुल शर्मा यांनी देखील तक्रारदार यांना घाबरवत त्यांच्याकडून सुमारे 60 हजार रुपये उकळले. सदर तरुणाला प्लेबॉय बनवायचे तरुणींनी आमिष दाखवले होते त्यातून त्याने कथित तरुणींच्या समोर व्हिडिओ कॉल वर नको तो प्रकार केला आणि तो जाळ्यात अडकला.