गाडीतून उतरताच ‘ रंजनाबाई ‘ धरली , पिशवीत सापडल्या नको त्या गोष्टी

Spread the love

आत्तापर्यंत गांजा विक्री प्रकरणात अटक केलेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश पुरुषांचा समावेश पाहायला मिळतो मात्र जळगाव जिल्ह्यात चक्क गांजा तस्करी करणाऱ्या एका महिलेला रंगेहात बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून गांजाची तस्करी करणाऱ्या या महिलेला चोपडा ग्रामीण पोलिसांनी रंगेहात धरलेले असून तिच्याकडून एक लाख दहा हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. सदर महिला तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात राहते. तिचे नाव रंजना गंगाधर तिडके ( वय 40 ) असे असून चार तारखेला ही कारवाई करण्यात आली.

बोरअजंटी तालुका चोपडा येथील वनविभागाच्या नाक्याजवळ गुप्त माहिती मिळाल्यावरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमर वसावे यांनी सापळा रचला होता. त्याप्रमाणे सदर गाडी आल्यावर त्यातील प्रवासी रंजना गंगाधर तिडके हिची झडती घेतली असता तिच्या जवळील असलेल्या एका पिशवीत पाच किलो 100 ग्रॅम वजनाचा हिरवा सुका गांजा आढळून आला. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस नाईक रितेश शिवाजी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रंजना तिडके हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंगीकारक औषधी द्रव्य आणि आणि मन व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8c 20 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकार प्रकाराचा पुढील तपास सुरू असल्याचे समजते.


Spread the love