महाराष्ट्रात फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीला आली असून एका पती-पत्नीने बटन बनवण्यासाठी साहित्य आणि यंत्र देण्याचे आमिष दाखवत 20 ते 25 महिलांना लाखो रुपयांना गंडा घातलेला आहे. मंगळवारी या महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून सदर प्रकरणी तपास सुरू आहे.
विजय सुरळकार व नंदा सुरळकार अशी या पती-पत्नीची नावे असून बटन बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि यंत्र आणून देऊ असे आमिष दाखवत गावातील 20 ते 25 महिलांकडून त्यांनी सुमारे 11 हजार रुपये प्रमाणे पैसे जमा केले आणि आणि बटन बनवण्यासाठी देण्यात येणारा कच्चामाल हा उपलब्ध करून दिला नाही त्यामुळे महिलांनी त्यांना या संदर्भात विचारले असता सदर कंपनी बंद पडली असे त्यांनी सांगितले.
आपले पैसे परत द्या असे म्हटलेले असताना त्यांनी ते पैसे परत दिले नाहीत म्हणून आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आले आणि त्यांनी जाब विचारतात या पती-पत्नीने त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. जळगाव जामोद पोलीस स्टेशनला सहा महिलांनी विजय सुरळकार आणि नंदा सुरळकार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या बंटी बबली दांपत्याने जामोद शहरासह ग्रामीण भागातील अनेक महिलांकडून अशाच पद्धतीने पैसे गोळा केल्याची माहिती असून सदर प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.