औरंगाबादमध्ये खळबळ..किर्तनकाराचा ‘ नको तो ‘ व्हिडीओ व्हायरल अन महिलेने घेतले विष

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका किर्तनकाराच्या सोबतच्या कीर्तनकार महिलेसोबत ‘ नको तो ‘ व्हिडिओ ‘ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका महिलेसोबत हे किर्तनकार नको त्या अवस्थेत दिसत असून याच्या दोन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. व्हिडिओतील किर्तनकार हे जिल्ह्यातील नामवंत किर्तनकार असून इतर वारकरी संप्रदाय संघटनेकडून या किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

औरंगाबाद आणि जिल्ह्याबाहेर एक प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या एका व्यक्तीचा महिलेसोबत ‘शरीरसंबंध’ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सदर व्यक्ती आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात. त्यांचा मोठा भक्त परिवार असून दोघांचे युट्यूबवर मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत मात्र त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला आहे.

दुसरीकडे या व्हिडिओमधील महिलेने सिल्लोड तालुक्यातील राहत्या गावी विष घेतल्याचे वृत्त असून तिला औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे तर व्हिडिओमधील पुरुष व्यक्ती याने काही जीवाचे बरे वाईट करू नये म्हणून त्याच्यावर देखील नजर ठेवण्यात येत आहे . वैजापूर तालुक्यातील 48 वर्षीय कीर्तनकार आणि सिल्लोड तालुक्यातील चाळीस वर्षीय महिला कीर्तनकार या अश्लील व्हिडिओ क्लिपमध्ये नको त्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. चित्रफितीमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीला एक मुलगा देखील आहे. सदरील व्हिडिओ हा याच कीर्तनकाराने चित्रित केल्याचंही या चित्रफितीमध्ये पाहायला मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी या व्हिडिओमध्ये असलेल्या किर्तनकार आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी करत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. व्हिडिओमधील दोघेही “आनंद संप्रदायिक” आहेत. त्याच विचारसरणीला मानणाऱ्या समाजामध्ये किर्तनकार म्हणून त्यांनी ख्याती मिळवलेली आहे. आपल्या किर्तनातून भक्ती व समाजप्रबोधन करत असल्यामुळे लाखो लोक त्यांना धार्मिक क्षेत्रात आपले आदर्श मानतात. आनंद संप्रदायिक असूनही बरेच वारकरीही त्यांना आपले आदर्श मानत आणि आपापल्या परिसरात त्यांचे किर्तनाचेही आयोजन करतात मात्र या दोघांनीही त्या लाखो श्रध्दाळू लोकांच्या धार्मिक भावनांवर खूप मोठा आघात केला असून महाराष्ट्रातील लोकांची आस्था आपल्या असभ्य वर्तणुकीने अश्लील प्रदर्शन करून त्यांनी ती आस्था पायदळी तुडविली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.


Spread the love