देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना बिहार इथे उघडकीस आली आहे .दोन वर्षांपूर्वी मृतक महिलेच्या पतीला रेल्वेत नोकरी लागली होती आणि नोकरीसाठी तो बाहेरगावी असायचा त्यामुळे मृतक महिला घरात एकटीच राहत होती अशाच वेळी तिचा खून झाला आणि तिचा मृतदेह घरात नग्नावस्थेत आढळून आला.
उपलब्ध माहितीनुसार, बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील औबरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या एका गावात ही घटना घडली आहे. सकाळी नेहमीप्रमाणे ही महिला आपल्या घरातून बाहेर पडली नाही आणि दरवाजाही बंद होता. तिच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न शेजाऱ्यांनी केला मात्र दरवाजा आतून बंद होता यानंतर शेजाऱ्यांनी त्या महिलेला कॉल केला तर फोनही स्विच ऑफ होता.
काही शेजारी घराच्या छतावर चढून पाहू लागले तेव्हा महिलेचा मृतदेह नग्नावस्थेत दिसून आल्याने त्यांना धक्काच बसला. महिलेच्या गळ्यावर काळे व्रण होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आपला तपास सुरू केला आहे. या महिलेवर बलात्कार झाल्याचा अंदाज आहे मात्र बलात्कार करून हत्या केली की नाही हे पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे .
मृतक महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी आरोप केला आहे की, तिला घरात एकटीला पाहून कुणीतरी गैरफायदा घेत बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. यासोबतच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे तसेच जोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर येत नाहीत तोपर्यंत मृतदेहाला हात लावून देणार नाही असा आक्रमक पवित्रा सुद्धा ग्रामस्थांनी घेतला होता मात्र त्यांना समजवण्यात पोलिसांना यश आले आणि महिलेचा मृतदेह पोस्ट मार्टेम साठी पाठवून देण्यात आला .