देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून चोर आणि त्यांनी टोळीने चक्क आम्ही सिंचन विभागाचे अधिकारी आहोत असे सांगत पूल नादुरूस्त झाल्याचे लोकांना सांगत चक्क पूल गायब केलेला आहे. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर सिंचन विभागाच्या कनिष्ठ अभियंता यांनी अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बिहार येथील रोहतास जिल्ह्यात भरदिवसा हा प्रकार घडलेला असून तब्बल तीन दिवसांनी आलेली व्यक्ती हे कोण होते याची माहिती ती परिसरात पसरली आणि त्यानंतर सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली. सिंचन विभागाचे कर्मचारी आहोत असे सांगत या चोरांनी चक्क एका कालव्यावर बांधलेला लोखंडी पूल दिवसाढवळ्या लांबवला./ जेसीबी घेऊन आल्यानंतर त्यांनी तो पूल तोडला आणि गॅस कटरच्या सहाय्याने त्याचे तुकडे केले आणि ते तुकडे ट्रकमधून घेऊन ते पसार झाले.
47 वर्षांपूर्वी येथील सासाराम परिसरात हा पूल बांधलेला होता. शंभर फूट लांब आणि दहा फूट रुंद असलेल्या या पुलासाठी तब्बल 500 टन लोखंड वापरण्यात आले होते. गावकऱ्यांनी हटकले असता त्यांनी आम्ही सिंचन विभागाकडून आलेलो आहोत असे सांगितले. सिंचन विभागाकडून याविषयी अधिक खुलासा देताना गावकऱ्यांनी हा पूल हटवण्याची मागणी केली होती मात्र आम्हाला काही आदेश नव्हते हे चोरांनी हेरले आणि त्यानंतर ही चोरी केली असे सांगण्यात आलेले आहे.