देशात गेल्या काही वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या घटना उघडकीला येत असून अशीच एक घटना गोवा इथे समोर आलेली होती. हैदराबाद येथून आलेला श्रीनिवास नावाचा एक पर्यटन हा गोवा येथे आल्यानंतर त्याच्या अवयवांची तस्करी करण्यात आली अशी बातमी हैदराबादमध्ये पसरली होती. हि बातमी पसरल्यानंतर गोव्यामध्ये देखील याची मोठी चर्चा झाली आणि गोवा पोलिसांची टीम चौकशीसाठी हैदराबाद येथे दाखल झाली आणि त्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्याचा कोणताही अवयव काढण्यात आलेला नाही याची खात्री करून घेण्यात आली सदर प्रकाराने पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या गोव्याची निष्कारण बदनामी झाली होती.
चार दिवसांपूर्वी एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनीने यासंदर्भात एक वृत्त दिले होते त्यानुसार, हैदराबाद येथील श्रीनिवास नावाचा 31 वर्षीय लॉरीचालक हा गोव्यात आल्यानंतर एका गटाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला बेशुद्ध केले जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या शरीरावर जखमा आणि पोटावर शिवण्याचे धागे मारलेले जातात असे धागे आढळून आले अशा आशयाचे वृत्त प्रसारित केले होते.
वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीप्रमाणे, आपल्या सोबत घडलेला हा प्रकार पाहून श्रीनिवास घाबरून गेला आणि त्याने अवयव तस्करी करणाऱ्या टोळीचा आपण शिकार झालेलो आहोत असे सांगितले. हैदराबाद येथे जाऊन त्यांने हे सांगितल्यानंतर स्थानिक माध्यमांनी ही बाजू चांगलीच उचलून धरली आणि राष्ट्रीय स्तरावर गोव्याची बदनामी होऊ लागली.
गोवा पोलिसांचे एक पथक हैदराबाद येथे दाखल झाले आणि श्रीनिवास याला भेटून त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली त्यावेळी त्याचे सर्व अवयव शाबूत असल्याचे समोर आले. त्याच्यावर गोवा येथे एका इस्पितळात त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असेही म्हटलेले आहे मात्र अवयव तस्करी कुठेही झालेली नाही अशी माहिती पोलिस निरीक्षक देसाई यांनी दिली आहे.
श्रीनिवास याचा अपघात झाला असल्याची शक्यता असून जखमी झाल्यानंतर त्याला कुणीतरी इस्पितळात दाखल करण्यात केले होते. त्याच्या डोक्याला इजा झाली होती. डोक्याचे एक बारीक हाड तुटून पडले होते आणि तो तुकडा त्याच्या पोटात ठेवण्यात आला असे अहवालात लिहिलेले आहे म्हणून त्याच्या पोटाची शस्त्रक्रिया करावी लागली आणि डोक्याची इजा बरी झाल्यानंतर ते हाड पुन्हा बसवावे लागणार आहे असे देखील या अहवालात लिहिलेले आहे.