महाराष्ट्रात अपहरणाची एक वेगळीच घटना ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथे समोर आलेली असून मध्य रेल्वेत कार्यरत असलेले उपअभियंता अमित सिंग ( राहणार नेरळ ) यांना दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी किडनॅप करण्यात आले होते मात्र खंडनी खोरांचा हा डाव पूर्णपणे फसला आणि त्यांनी अमित सिंग यांना सोडून दिले.
डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले आहे की, सिंग हे मध्य रेल्वेत कामाला असून पाच एप्रिलला रात्रपाळीला कामावर आलेले असताना तीन अनोळखी व्यक्तीने त्यांना बाहेर बोलावून लाल रंगाच्या गाडीत बसून किडन्याप केले होते. त्यावेळी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली आणि त्यासाठी त्यांनी सिंग यांच्या पत्नीला फोन केला.
पत्नीने घाबरून न जाता रेल्वे नियंत्रण कक्षाची संपर्क साधला आणि त्यानंतर नियंत्रण कक्षाने सिंग यांच्याशी संपर्क साधत त्यांना धीर दिला. ज्या वाहनातून त्यांना किडन्याप करण्यात आलेले होते. त्या वाहनांचे लोकेशन पोलिसांनी ट्रेस करायला सुरु केले त्यामुळे किडनॅप करणारी व्यक्ती सतर्क झाले आणि त्यांनी अवघ्या दोन तासात सिंग यांना पुन्हा रेल्वे परिसरात सोडून दिले.
रेल्वे पोलिसांनी लोहमार्ग पोलिसांनी चार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून सिंग यांच्या रात्रीच्या ड्युटीची वेळ आणि कौटुंबिक माहिती आर्थिक विषय याबाबत त्रयस्थ व्यक्तीकडे माहिती कशी असू शकते या शक्यता गृहीत धरून आरोपींचा शोध सुरू करण्यात आलेला आहे.