लुटीचा ‘ वेगळाच ‘ प्रकार मात्र वारंवार तसेच होत असल्याने सापळा रचला अन ..

Spread the love

महाराष्ट्रात गुन्हेगारीचा एक वेगळाच पॅटर्न सध्या सुरू असून कधी तोंडाला मास्क नाही तर कधी इतर तपासणीच्या नावाखाली सीआयडी असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या एका भामट्याला 9 एप्रिल रोजी गेवराई पोलिसांच्या बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, आजम खान अफजल खान पठाण ( वय 56 राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा ) असे आरोपीचे नाव असून नामदेव महादेव नागरे ( वय ७३ राहणार संगम जळगाव ) यांना गेवराई येथील एका बसस्थानकाजवळ त्याने आडवत शनिवारी मास्क का घातला नाही म्हणून दंड म्हणून ३७०० रुपये द्यावे लागतील असे सांगत लुटले होते त्यानंतर त्याला गेवराई पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. चौकशीमध्ये त्याने अशाच पद्धतीने पोस्टातून निवृत्त झालेले कर्मचारी विष्णू रंगराव पंडित ( वय 70 राहणार दैठण तालुका गेवराई ) यांनादेखील 4 मार्च रोजी असेच लुटले होते.

पंडित बस स्थानकाकडे जात असताना बिर्याणी हाऊससमोर एका अनोळखी व्यक्तीने त्यांचा डावा हात पकडुन मी सीआयडी आहे. तुमच्या खिशात गांजा आहे मला दाखवा असे म्हणाला आणि त्यांच्या खिशाची झडती घेत त्यांच्या खिशातील 9150 रुपये त्याने काढून घेतले आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन तो फरार झाला होता.

वारंवार अशाच स्वरूपाच्या घटना समोर येऊ लागल्याने पोलिस देखील सतर्क झाले आणि त्यांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, सुरेश पारधी, कृष्णा जायभाये, विठ्ठल देशमुख, दिलीप सरोदे यांनी तपास चक्रे फिरवून त्याला अटक केली आहे. आरोपी आजम खान याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


Spread the love