पुणे हादरलं..पिंपरीत प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीचे टोकाचे पाऊल

Spread the love

पुणे शहरानजीक एक धक्कादायक घटना पिंपरी इथे उघडकीस आली असून पिंपरी इथे तरुणीसोबत पाच वर्ष प्रेमसंबंध ठेऊन तिला लग्नाचे आश्वासन दिले मात्र त्यानंतर फोन करून तिला मानसिक त्रास दिला म्हणून एका तरुणीने आत्महत्या केली आहे . प्रियकर तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संत तुकाराम नगर पिंपरी येथे २५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे .

तरुणीच्या आईने याप्रकरणी बुधवारी (दि. १३) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पप्पू उर्फ सुनील शाम गोलाईत (वय २५, रा. परभणी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी आणि आरोपी यांचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपीने तरुणीसोबत लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते. तरुणी ही वेगळ्या जातीची आहे आणि तो उच्चवर्णीय आहे अशा कारणावरून ४ फेब्रुवारी २०२२ रोजी तरुणीला फोनवरून मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस आयुक्त डाॅ. सागर कवडे तपास करीत आहेत.


Spread the love