पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून महिला हिंसाचाराचे प्रमाण वाढलेले पहायला मिळत आहे. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात समोर आली असून चाकण जवळील मेदनकरवाडी येथे पत्नीची हत्या करून आरोपी सातारा इथे पळून जात असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. चाकण पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे .
उपलब्ध माहितीनुसार, सचिन रंगनाथ काळेल (सध्या रा. मेदनकरवाडी, चाकण, ता.खेड जि. पुणे, मूळ सातारा) असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी पतीचं नाव असून त्याने 23 वर्षीय पत्नी अश्विनी सचिन काळेल हिची हत्या केल्याचा आरोप आहे. चारित्र्यावर संशय घेऊन सचिनने तिला जीवे ठार मारल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी पतीला गजाआड केल असून तो खून केल्यावर सातारा इथे पळून चाललेला असतानाच पोलिसांना या प्रकाराचा सुगावा लागला आणि त्यांनी त्याला बेड्या ठोकल्या.
आरोपी सचिन याने पत्नीची गळा चिरुन हत्या केली. पुणे जिल्ह्यात चाकण जवळील मेदनकरवाडी येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेदनकरवाडी येथे एका इमारतीत काळेल कुटुंब भाड्याने राहात आहे. सचिन सातत्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात भांडणही होत असे. मंगळवारी पहाटे सचिनने गाढ झोपेत असलेल्या पत्नीचा आपल्या मुलींसमोर सुरुवातीला गळा आवळून आणि मग चाकूने वार करून खून केला आणि त्यानंतर तो मूळ गावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.