देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून अर्ध्या रात्री प्रेयसीला भेटायला जाणे एका पोलीस हवालदाराला चांगलेच महागात पडले आहे. उत्तर प्रदेश येथील हा पोलीस कर्मचारी चक्क अर्ध्या रात्री पोलीस चौकीजवळ राहणाऱ्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता मात्र शेजाऱ्यांनी त्याला घेरले आणि त्यामुळे गडबडलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याने चक्क कपडे न घालता हातात चप्पल घेऊन तेथून पळ काढला. संबंधित हवालदाराला एसपींनी निलंबित केले आहे.
संबंधित हवालदाराला पूरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंघचाई चौकीवर एक वर्ष झाले असून बोलचालीतुन चौकीशेजारीच असलेल्या महिलेसोबत त्याची जवळीक वाढली. गेल्या काही दिवसांत नाईट ड्युटीवर असलेला हा कर्मचारी महिलेच्या घराजवळच फिरत आपली ड्यूटी करत असायचा आणि वेळ मिळाली कि त्याच्या प्रेयसीच्या घरात घुसायचा. विवाहित महिलेच्या पतीला यासंदर्भात माहिती नव्हती मात्र त्याचा हा कारनामा परिसरातील चौकस दृष्टिकोन असलेल्या नागरिकांच्या लक्षात आला होता.
रविवारी रात्री उशिरा हा कर्मचारी या महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला खरा मात्र आधीपासूनच आरोपीवर लक्ष ठेवून असलेल्या लोकांनी त्याला घेरले. आता आपला चांगलाच कार्यक्रम होणार हे लक्षात आल्यावर हा आरोपी पोलीस कर्मचारी केवळ बनियन-अंडरविअर आणि हातात चप्पल घेऊन भिंतीवरून उडी मारून पोलीस चौकीवर पळून गेला. गावकऱ्यांनी त्याचा पाठलागही केला पण तो पळून जाण्यात यशस्वी ठरला मात्र त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.